Uncategorized

त्रिवेणी संगमावर भक्तीचा महासागर! कालेश्वर येथे सरस्वती अंत्य पुष्कर सोहळ्याला भव्य प्रारंभ

सिरोंचा : गोदावरी, प्राणहिता आणि अदृश्य सरस्वतीच्या पवित्र त्रिवेणी संगमावर वसलेल्या #कालेश्वर येथे आजपासून सरस्वती अंत्य पुष्कर सोहळ्याला अत्यंत भक्तिमय वातावरणात भव्य सुरुवात झाली. तेलंगणा सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या ऐतिहासिक धार्मिक सोहळ्याचा शुभारंभ राज्याचे मंत्री दुद्धिल्ला श्रीधर बाबू, देवादाय विभागाच्या मंत्री कोंडा सुरेखा तसेच कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरू श्री शंकर विजयेंद्र सरस्वती यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. पहाटे ५.४३ वाजता कांची पीठाधिपतींच्या हस्ते पवित्र पुष्कर स्नान करण्यात आले आणि वैदिक मंत्रोच्चारात सोहळ्याची विधिवत सुरुवात झाली.

#कालेश्वर मुक्तेश्वर स्वामी मंदिर परिसर पहाटेपासूनच “हर हर महादेव”च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. त्रिवेणी संगमावर स्नानासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. तेलंगणा, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि आंध्रप्रदेशातून मोठ्या संख्येने श्रद्धाळू येथे दाखल झाले. पवित्र स्नान करून #कालेश्वर मुक्तेश्वर स्वामींचे दर्शन घेतल्यास विशेष पुण्य लाभते, अशी श्रद्धा असल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

यावेळी मंत्री दुद्धिल्ला श्रीधर बाबू यांनी सांगितले की, “सरस्वती अंत्य पुष्कर हा अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक महत्त्व असलेला सोहळा आहे. मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंत्री कोंडा सुरेखा यांच्या नेतृत्वात तेलंगणा सरकारने व्यापक नियोजन केले आहे. मागील वर्षी झालेल्या सरस्वती आदि पुष्कराच्या अनुभवाच्या आधारे यंदा कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. हे १२ दिवस अत्यंत पुण्यदायी मानले जातात. या काळात त्रिवेणी संगमात स्नान करून #कालेश्वर मुक्तेश्वर स्वामींचे दर्शन घेतल्यास विशेष पुण्य लाभते.”

२१ मे ते १ जूनदरम्यान होणाऱ्या या १२ दिवसीय सोहळ्यासाठी राज्य सरकारने तब्बल ३०.६३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या काळात ३० ते ४० लाख भाविक #कालेश्वर येथे येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली असून, त्या पार्श्वभूमीवर युद्धपातळीवर तयारी करण्यात आली आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.