महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी दिनांक २१ मेपासून सुरू झाली आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी वेळेत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून आपल्या पसंतीच्या महाविद्यालयांची निवड करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे, गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र आदी कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज सादर करावा. कोणतीही अडचण टाळण्यासाठी अंतिम तारखेपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.










