Uncategorized

20 मे रोजी देशव्यापी मेडिकल बंद; नागरिकांनी आजच औषधांचा साठा करून ठेवावा – संतोष ताटीकोंडावार यांचे आवाहन

अहेरी : ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टच्या आवाहनानुसार 20 मे 2026 रोजी देशभरातील मेडिकल स्टोअर्स बंद राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी नागरिकांना 19 मेपूर्वी आवश्यक औषधे खरेदी करून ठेवण्याचे आवाहन केले आहे.

ऑनलाईन औषध विक्री व बनावट औषधांच्या वाढत्या धोक्याविरोधात हा बंद पुकारण्यात आला असून गडचिरोली जिल्ह्यातील सर्व केमिस्ट या आंदोलनात सहभागी होणार आहेत. बंददरम्यान रुग्णालयातील आपत्कालीन औषध सेवा सुरू राहणार असली तरी नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी, असे ताटीकोंडावार यांनी म्हटले आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.