सिरोंचा : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक २०२६ चे मतदान दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी सिरोंचा येथील तेलंगणा सीमावर्ती भागात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
निवडणुकीच्या अनुषंगाने सीमावर्ती भागातून होणाऱ्या वाहनांच्या ये-जा हालचालींवर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. शासनाच्या नियमानुसार प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात असून, संशयास्पद हालचालींना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
या बंदोबस्तादरम्यान श्री. ओम् आकुळवर सर, श्री. बी. एस. मारबते आणि पोलीस अंमलदार श्री. आदिनाथ केंद्रे यांच्या उपस्थितीत वाहन तपासणी व सुरक्षा व्यवस्था राबविण्यात येत आहे. सीमावर्ती भागातून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी करून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.
निवडणूक प्रक्रिया निर्भय, पारदर्शक आणि शांततेत पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी तसेच वाहनचालकांनी तपासणीदरम्यान पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिरोंचा-तेलंगणा सीमेवरील सुरक्षा व्यवस्थेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.










