अहेरी : महाराष्ट्र–तेलंगणा सीमेलगत असलेल्या वांगेपल्ली नदीघाट येथील पोलीस चेकपोस्टवर अहेरी पोलीस आणि गडचिरोली वाहतूक शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करत १२ बिअरच्या बाटल्या असलेली एक पेटी जप्त केली. या प्रकरणी शैलेश अटेला (रा. चल्लेवाडा) याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.
मा. पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांच्या आदेशानुसार तसेच अहेरीचे पोलीस निरीक्षक हर्षल एकरे आणि गडचिरोली वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक शरद मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
वांगेपल्ली नदीघाट येथील चेकपोस्टवर तपासणीदरम्यान ही कारवाई करण्यात आली. यावेळी बिअरची एक पेटी, ज्यामध्ये १२ बिअर होत्या, जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी हवालदार मोहन तुलावी यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास अहेरी पोलीस करीत आहेत.
या संयुक्त कारवाईत गडचिरोली वाहतूक शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय चक्कावार, हवालदार मोहन तुलावी, पोलीस शिपाई विजय करमे, दत्तू मडेमवार तसेच अहेरी पोलीस ठाण्याचे नापोशि निलावार आणि पोलीस शिपाई रोहित मोहुर्ले यांनी सहभाग घेतला.
सीमावर्ती भागातील अवैध मद्य वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून चेकपोस्टवर तपासणी आणि कारवाई केली जात आहे.










