गडचिरोली : जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचार, गैरप्रकार आणि अनियमिततेसंदर्भातील तक्रारींची दखल घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची महत्त्वपूर्ण सभा गुरुवार, दिनांक 21 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना भ्रष्टाचाराविरोधात थेट आपली बाजू मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली असून, शासनाच्या विविध विभागांमध्ये कामकाजादरम्यान लाचखोरी, गैरव्यवहार किंवा अन्य अनियमितता झाल्याची तक्रार असल्यास संबंधित नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे व ठोस पुराव्यांसह सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सभेमध्ये प्राप्त तक्रारींची समितीमार्फत सुनावणी करून संबंधित प्रकरणांवर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी या संधीचा लाभ घेत वेळेत उपस्थित राहून आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन सदस्य सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे यांनी केले आहे.










