Uncategorized

20 मे रोजी औषध दुकाने बंद? प्रशासन अलर्ट मोडवर; रुग्णांसाठी हेल्पलाईन सुरू

All India Organisation of Chemists and Druggists यांच्या देशव्यापी बंदच्या हाकेनंतर गडचिरोली जिल्हा प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांना अत्यावश्यक औषधांचा पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात बुधवार, दि. 20 मे 2026 रोजी देशभरातील किरकोळ आणि घाऊक औषध व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अन्न व औषध प्रशासनाने औषध विक्रेत्यांशी थेट संपर्क साधत बंदमध्ये सहभागी न होण्याचे आवाहन केले आहे. काही औषध दुकाने सुरू ठेवण्याबाबत संबंधित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी प्रशासनाने विशेष हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले आहेत. औषध निरीक्षक श्रीमती नालंदा उरकुडे (9096414104) तसेच सहायक आयुक्त (औषधे) श्री नीरज लोहकरे (7276544972) यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.

तालुकानिहाय संपर्क क्रमांक :

सिरोंचा – 9421729671

भामरागड – 9404438383

एटापल्ली – 9421856516

आलापल्ली – 9421729384

अहेरी – 9767820220

मुलचेरा – 9421854819

आष्टी – 9422151299

चामोर्शी – 9588678242

गडचिरोली – 9421735620 / 9423422130

आरमोरी – 9403820216 / 9420973680

वडसा – 9422150640 / 8999362844

कुरखेडा – 9404831332

कोर्ची – 9422154766 / 7757005944

धानोरा – 7588772743

अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, कोणतीही अडचण निर्माण झाल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असे सहायक आयुक्त (औषधे) श्री नीरज लोहकरे यांनी सांगितले आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.