जिल्हा ताज्या बातम्या

गडचिरोलीतील २२ मिनी सेतू केंद्रांसाठी अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध

गडचिरोली : जिल्ह्यातील नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी २२ मिनी सेतू केंद्रांमध्ये केंद्रचालकांची नियुक्ती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्रांचा’ समावेश आहे. या केंद्रचालक निवडीसाठी प्राप्त अर्जांची अंतिम पात्र व अपात्र यादी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या ९ जुलै २०२६ रोजीच्या शासन शुद्धीपत्रकातील तरतुदींनुसार ही निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे. संबंधित उमेदवारांच्या अर्जांची छाननी करून अंतिम पात्र व अपात्र यादी तयार करण्यात आली आहे.

शासन शुद्धीपत्रकातील मुद्दा क्र. ७ (४) नुसार संबंधित उमेदवारांची पोलीस चारित्र्य पडताळणी करण्याची अट लागू राहणार आहे. त्यामुळे अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही नियमानुसार आवश्यक पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

गावपातळीवर नागरिकांना पारदर्शक, सुलभ आणि गतिमान डिजिटल सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मिनी सेतू केंद्रे अधिक सक्षम केली जात आहेत. अर्जदारांना अंतिम पात्र व अपात्र यादी गडचिरोली जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर gadchiroli.gov.in⁠� पाहता येणार आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.