जिल्हा ताज्या बातम्या

गडचिरोलीत गणेशोत्सवाचा सांस्कृतिक जागर; गणेश नृत्य, भक्तिगीतांची मेजवानी

गडचिरोली : गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता सामाजिक न्याय विभागाच्या सभागृहात पार पडणार आहे.

संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि स्थानिक कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात विविध सांस्कृतिक कलाप्रकारांच्या माध्यमातून कला आणि संस्कृतीचा जागर करण्यात येणार आहे.

या सांस्कृतिक सोहळ्यात गणेश नृत्य, समूह नृत्य, भक्तिगीत आदी विविध कलाप्रकार सादर केले जाणार आहेत. कलाकारांच्या सादरीकरणातून गणेशोत्सवाचा उत्साह, भक्तिभाव आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडणार असून, उपस्थितांना सांस्कृतिक कार्यक्रमांची आनंददायी मेजवानी अनुभवता येणार आहे.

कला, संस्कृती, श्रद्धा आणि सामाजिक एकात्मतेचा संगम असलेल्या या सांस्कृतिक सोहळ्यास गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.