Uncategorized

मोहरम उत्सवासाठी अहेरी पोलिसांची जय्यत तयारी; १०० हून अधिक पोलीस बळासह रूट मार्च

अहेरी : आगामी मोहरम उत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडावा, तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अहेरी पोलिसांनी आज दिनांक २५ जून २०२६ रोजी शहरातून भव्य रूट मार्च काढला. उपविभागीय पोलीस अधिकारी, अहेरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

मोहरम उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून पूर्वतयारीचा भाग म्हणून सायंकाळी ४.३० ते ५.२० वाजेपर्यंत अहेरी पोलीस स्टेशन येथे दंगा काबू पथकाची (दंगा नियंत्रण पथक) तालीम घेण्यात आली. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून शिस्तबद्ध रूट मार्च काढण्यात आला.

हा रूट मार्च अहेरी पोलीस स्टेशन येथून सुरू होऊन मज्जित चौक, आझाद चौक, दानशूर चौक, राजवाडा रोड, गांधी चौक, गड अहेरी रोड या मार्गाने काढण्यात आला. शहरातील संवेदनशील भागांची पाहणी करत हा मार्च पुन्हा पोलीस स्टेशन येथे समाप्त झाला.

या रूट मार्चमध्ये मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. यामध्ये ४ पोलीस अधिकारी, ३८ पोलीस अंमलदार, आरसीपी प्लाटून (प्राणहिता) चे ३० अंमलदार तसेच ३० होमगार्ड सहभागी झाले.

यावेळी पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करून मोहरम उत्सव सलोख्याच्या वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.