भामरागड : वीरांगना राणी दुर्गावती यांच्या बलिदान दिनानिमित्त दिनांक 24 जून 2026 रोजी राणी दुर्गावती चौक, पोलीस स्टेशन भामरागड येथे मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
वीरांगना राणी दुर्गावती यांचे 24 जून 1564 रोजी मुघल सेनापती आसफ खान यांच्याशी लढताना वीरमरण झाले. त्यांच्या अतुलनीय शौर्य आणि बलिदानाच्या स्मरणार्थ हा दिवस राणी दुर्गावती बलिदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
कार्यक्रमाची सुरुवात भामरागड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अमर मोहिते यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी वीरांगना राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
कार्यक्रमाला भूमक दादाराव कुसराम, अनवरशहा मडावी, समाजसेवक सब्बरबेग मोगल, जगदीश पूंगाटी सर, जे. मडावी सर, दौलत आरकी, संतोष सिडाम, दशरथ मडावी, पत्रकार अविनाश नारनवरे, योगेंद्र सडमेक, सुधाकर पुंगाटी, विकास मडावी, महेंद्र कुसराम यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
महिला वर्गातून सुशीला मडावी, तारा मडावी, सुनंदा ताई मडावी, मंगला मडावी, गनश्री मॅडम, स्वाती मॅडम, लक्ष्मी मडावी, भारती ईष्टाम, लता मडावी, गंगू मडावी, यशोदा पूंगाटी, मीना तलांडे, पायल तलांडे यांचीही उपस्थिती होती.
यावेळी वीरांगना राणी दुर्गावती यांच्या स्मरणार्थ मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच त्यांच्या शौर्याच्या घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या शेवटी दशरथ मडावी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.










