गडचिरोली : श्री माता वासवी कन्यका मंदिर, गडचिरोली येथे गडचिरोली जिल्हा आर्य वैश्य महासभेची जिल्हास्तरीय महासभेची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. श्री पद्मावार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला महासभेचे राज्य संघटक श्री. प्रदीप कोकडवार यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. राजूभाऊ मुक्कावार, श्री. दीपकभाऊ निलावार, श्री. गजानन कोटावार आणि श्री. धनंजय ताटल्लीवार यांच्या समन्वयातून निवडणूक प्रक्रिया पार पडली.
यावेळी जिल्हा महासभेच्या अध्यक्षपदी श्री. शरद कोलेटीवार, सचिवपदी श्री. संतोष तंगडपल्लीवार तर कोषाध्यक्षपदी श्री. नंदकिशोर ओल्लालवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी श्री. प्रकाश गुडेलिवार, श्री. अनिल गोगुलवार, श्री. समीर कटकमवार, श्री. मधुकर पुल्लूरवार आणि श्री. जगदीश कोंकमुट्टीवार यांची निवड झाली. सहसचिवपदी श्री. प्रशांत रागीवार व श्री. नितीन बट्टूवार, जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी श्री. संजय यमसलवार तर कार्याध्यक्षपदी श्री. प्रशांत तम्मेवार यांची निवड करण्यात आली.
तसेच सल्लागारपदी श्री. संजय नार्लवार आणि श्री. संतोष संगनवार यांची नियुक्ती करण्यात आली. नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडण्यासोबतच सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. समाजाची एकजूट मजबूत करणे, युवकांचे सक्षमीकरण आणि शैक्षणिक प्रगतीला चालना देणे यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे उपस्थित समाजबांधवांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. समाजातील एकोपा, सामाजिक बांधिलकी आणि विकासात्मक उपक्रमांना प्राधान्य देत जिल्ह्यात महासभेचे कार्य अधिक प्रभावी व व्यापक करण्याचा निर्धार नवनिर्वाचित कार्यकारिणीने व्यक्त केला. शरद कोलेटीवार यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्हा आर्य वैश्य महासभेला नवी दिशा व गती मिळेल, असा विश्वास उपस्थित समाजबांधवांनी व्यक्त केला.










