जिल्हा ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या कुंचल्यातून उमटली कलागुणांची रंगीत दुनिया; ताटीगुडम येथे बालचित्रकला स्पर्धा उत्साहात

अहेरी : महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बालचित्रकला स्पर्धा–२०२६ चे आयोजन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, ताटीगुडम, केंद्र राजाराम, पंचायत समिती अहेरी येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.

या स्पर्धेत शाळेतील एकूण ४८ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला रंगांची जोड देत विविध विषयांवरील आकर्षक चित्रे साकारली. आपल्या कलागुणांचे सुंदर प्रदर्शन करत विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला.

स्पर्धेच्या आयोजनावेळी मु.अ. कल्पना रागीवार, प्राथमिक शिक्षक श्री. पेंदाम सर, कटकरवार सर व दुर्गे सर उपस्थित होते. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना चित्रकलेतील विविध पैलू समजून घेण्यास तसेच आपली सर्जनशीलता व्यक्त करण्यास प्रोत्साहन मिळाले.

विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शाळेतील वातावरण कलामय झाले होते. स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला असून, त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या उपक्रमातून झाले.
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. तसेच स्पर्धेचे यशस्वी आयोजन व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल शाळेतील सर्व शिक्षकांचे कौतुक व आभार व्यक्त करण्यात आले.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.