अल्लापल्ली/नागेपल्ली : महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा अल्लापल्ली तथा आर्य वैश्य कोमटी समाज अल्लापल्ली/नागेपल्ली यांच्या वतीने माजी वनमंत्री व आमदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण सोहळा साजरा करण्यात आला.
डॉ. चिमरालवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्व समाजबांधवांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या वेळी महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रशांत रागीवार, विशेष भटपल्लीवार तसेच अल्लापल्ली-नागेपल्ली येथील पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.
आर्य वैश्य समाजासाठी आदरणीय असलेले माजी वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी वनमंत्रीपदाच्या काळात वृक्षारोपण, हवामान बदल व जमिनीची होणारी हानी रोखण्याबाबत केलेल्या कार्याची पावती म्हणून दरवर्षी त्यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा केला जातो. “झाडे लावा, झाडे जगवा व पर्यावरण वाचवा” या संदेशासह हा उपक्रम राबविण्यात आला.

महासभेच्या गडचिरोली, चामोर्शी, आष्टी, अहेरी, आल्लापल्ली व एटापल्ली येथील समाजबंधू-भगिनींनी उत्स्फूर्तपणे वाढदिवस साजरा केला.










