मुंबई : दहावी नंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि वास्तुकला पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ ईच्छिणाऱ्या अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी राज्यातील पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया दिनांक 20 मे 2026 पासून सुरु होत आहे.
प्रवेश प्रक्रिया वेळेत व नियोजनबद्ध पध्दतीने राबविण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. तरी प्रवेश घेऊ ईच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना व पालकांना सर्व कागदपत्रांसह तयारीत राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.










